97308 48504 / 9765 313131

Pune : Every Saturday : 10 am to 5 pm

Wada : Every Thursday & Sunday : 10 am to 5 pm

Thane : Monday to Friday : 10 am to 5 pm

धूम्रपान आणि आपली त्वचा

Palpitations & Smoking

शरीराती दृश्य भाग म्हणजे त्वचा, डोळे, केस, दात जे आपल्या सौंदर्यात व आत्मविश्वासात कळत नकळतपणे contribute करत असतात. पण यांना काहीही इजा झाल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. पण धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये या विषयीच्या जागरूकतेचा अभाव नक्कीच आढळतो. समाजात वावरताना आपल्याला अनेक व्यक्ती धूम्रपान करताना दिसतात. त्याचा आपल्याला त्रास हॊतॊ .त्या व्यक्तीलाही याचा त्रास होतो. अनेक शारीरिक आजार जसे फुफुसाचे, हृदयाचे, तसेच कर्करोग होऊ शकतात आणि त्याला आपल्या त्वचेचेही बरेचसेनुकसान सहन करावे लागते.

त्वचा

तंबाखूतील निकोटीनमुळे त्वचेतील रक्तवाहिन्याला इजा पोहोचते. त्या मोठ्या होतात अथवा पसरतात. केशिका भिंतींना नुकसान होते. त्वचेला होणार रक्तप्रवाह कमी होतो. याचे परिणाम आपण त्वचेवर पाहू शकतो. आपणास जांभळे डाग अथवा नसांचे दिसून येते . त्वचेतील collagen व इलास्टीन या तंतूंना निकोटिनमुळे नुकसान होते. त्यामुळे त्वचा ओघळते कारण हे तंतू घट्टपणा व लवचिकपणा देणारे असतात. त्वचेवरील सुरकुत्या वाढतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीची त्वचा वृद्ध दिसू लागते. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या वृद्ध दिसू लागतात. या सुरकुत्या चेहेरीवरच नाही तर शरीराच्या इतर भागावर हि दिसून येतात . वारंवार सिगारेट ओढल्यामुळे ओठाभोवती उभ्या सुरकुत्या पडतात. तसेच डोळ्यांच्या बाजूलाही सुरकुत्या वाढतात.

जखमा

धुम्रपानामुळे शरीरावरील जखमा भरून येण्यात अडथळा येतो. जखमा जास्त काळ राहिल्या मुळे त्यात जंतू संसर्ग होतो.

त्वचेचा रंग

त्वचेच्या रंग वरही या व्यसनाचा परिणाम होतो. धुम्रपानामुळे त्वचेला ऑक्सिजन पोहोचण्यात अडथळा येतो. ती करड्या अथवा केशरी रंगाची होऊ शकते.

हातांची बोटे

बराच काळ सिगारेट ओढताना बोटात पकडल्यामुळे बोटाना तसेच नखांवर पिवळेपणा येतो. हे डाग पाण्याने अथवा साबणाने नष्ट होत नाहीत.

दात

दातही या व्यसनापासून वाचत नाहीत. त्यांच्यावर डाग पडतात. हिरड्यांचा रोग होतो.तोंडाला दुर्गंधी येते.

केस

सिगारेटच्या धुरात असणाऱ्या विषारी धुरामुळे केसांच्या मुळांना नुकसान होते. ते पातळ होऊ लागतात. ते अकाली पांढरे होऊ लागतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये केस गळतीचे प्रमाण इतरांच्या तुलनेत जास्त असते. धूम्रपान करणे हे डोक्यला टक्कल पाडण्याचे महत्वाचे कारण आहे.

सोरायसिस

सोरायसिस हा आजकाल बळावलेला आजार आहे . यात त्वचेवर जाडसर खपली असणारे चट्टे येतात. हे चट्टे खास करून हाताचे ,टाळू,हात,पाय अथवा पायांवर दिसून येतात. धूम्रपान करणारी व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

डोळे

अशा व्यक्तीला निकोटिनच्या तलफेमुळे रात्री लागणारी झोप हि कमी असते. त्यामुळे हि व्यक्ती चिडचिडी, बेचैन व अस्वस्थ असते. त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात तसेच डोळे सुजल्यासारखे असतात.

त्वचेवर डाग

वाढत्या वयाप्रमाणे आपली शरीरावर सूर्यप्रकाशाचा होणार परिणाम वाढत जातो. त्वचेवर डाग येतात. ती काळवंडते धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये हे डाग लवकर येतात.

पोषक तत्व

सिगारेटच्या धुरात असलेला कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजनची जागा घेतो . त्वचा कोरडी आणि रंगहीन होते. त्वचेला आवश्यक पोषक तत्व न मिळाल्यामुळे ती कोरडी व रंगहीन होते.

अशा प्रकारे, कोणताही गंभीर प्रश्न टाळण्यासाठी आणि कोणत्याही हानिकारक परिणामाशिवाय धूम्रपान सोडणे हाच योग्य मार्ग आहे. त्यासाठी आमच्या Let's Quit च्या मुंबई किंवा पुणे मधील क्लिनिक ला आजच भेट द्या. खास होमिओपॅथीच्या सिगारेट सोडवू शकणाऱ्या उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी आजच संपर्क साधा www.letsquit.net आणि आरोग्यदायी होण्यास मदत करा.

Book your Appoinment




Call Now Enquire Now