97308 48504 / 9765 313131

Pune : Every Saturday : 10 am to 5 pm

Wada : Every Thursday & Sunday : 10 am to 5 pm

Thane : Monday to Friday : 10 am to 5 pm

ई सिगारेट बंदी नंतर काय ?

ई सिगारेट बंदी नंतर काय ?

केंद्र सरकारने ई सिगारेटचा वापर, निर्माण, आयात, निर्यात यावर घातलेल्या बंदी पश्चात आता काय हा प्रश्न याचा वापर करणाऱ्या सर्वांना भेडसावत असणार.ई सिगारेट हा धूम्रपान सोडण्याचा सोप्पा उपाय (easy way to stop smoking ) म्हणून आपण स्वीकारला होता .परंतू कालांतराने असे दिसून आले की धूम्रपानाचे अनेक दुष्परिणाम यातही आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ई सिगारेट वापरणाऱ्या व्यक्तीला शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे आजार तसेच कॅन्सर होतात. तसेच ह्याचा वापर माणसाला व्यसनाधीन करतो.

ई सिगारेट म्हणजे नेमके काय ? तर एक बॅटरी वर चालणारे यंत्र! हे यंत्र वायु रूपात असलेले निकोटीन वाफेच्या रूपात बाहेर सोडते. हा धूर ज्या व्यक्ती सिगारेट सोडत आहेत (quitting cigarette) त्यांची तलफ भागवतो. तंबाखूचा वापर यात नसतो. तसेच यातून राख बाहेर पडत नाही. बोटांवर डाग पडत नाहीत. इ सिगारेटच्या टोकाला LED लाइट पेटतो.पेटत्या सिगारेटच्या टोकाप्रमाणे आभास निर्माण होतो. हे यंत्र बॅटरीवर चालते. सिगारेटप्रमाणे धूर निघत असल्यामुळे हे यंत्र धूम्रपानाला एक पर्याय मानले जाते.

ई सिगारेटचे शरीरावर होणारे परिणाम

ई सिगारेटचे सामाजिक दुष्परिणाम

  • ई सिगारेट ही आताच्या काळाची गरज आहे असे समजून आपली सामाजिक प्रतिमा उजळण्यासाठी काहीजण याचा वापर करतात.
  • ज्या व्यक्तीची धूम्रपानाची तलफ सोडण्याची (quit smoking cravings) इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय म्हणून मानला गेला. परंतु आता हेच व्यसन बनले आहे.
  • वेगवेगळ्या आकर्षक स्वादात व रंगात ही उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांना याची सवय लागते.
  • सिगारेटपेक्षा सुरक्षित समजली जात असल्याने मुले आपल्या समवयस्क मित्रांसोबत मजा म्हणून याचा वापर करतात. त्याच रूपांतर काही काळाने व्यसनात होते. तसेच मोठ्या प्रमाणावर धूम्रपान करणारे वयस्क लोक धूम्रपान सोडण्याचा सोपा उपाय (easy way to stop smoking) म्हणून निर्धास्तपणे याच्या आहारी जातात.

ई सिगारेट वरील बंदीचे पडसाद काय उमटतील ?

एकतर ज्या व्यक्ती मला धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे ( I want to stop smoking) असे सांगतात ते परत सिगारेटकडे वळण्याची दाट शक्यता आहे.

शाळाकॉलेजांतील ई सिगारेटचे व्यसन करणाऱ्या मुलांना आपली धूम्रपानाची तलफ सोडणे (quit smoking cravings) कठीण होईल. याचे पर्यावसन म्हणजे तंबाखू व तत्सम नशा देणारे इतर पदार्थ वापरू लागतील.

या बंदीमुळे ई सिगारेट चा काळा बाजार चालू होईल. किंमती भरमसाठ वाढतील. हि गरज पूर्ण करण्याची पात्रता नसेल तर गुन्हे केले जातील. गुन्हेगारी वाढून सामाजिक सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ई सिगारेट वर बंदी घालून मुख्य मुद्दा बाजूला पडतो आहे. मूलतः धूम्रपान हे कुठल्याही स्वरूपात घातकच आहे. कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात केले तरी त्याचे दुष्परिणाम होतातच. मला धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे (I want to stop smoking) असे म्हणणारे आधीचे एक व्यसन सोडून दुसऱ्या व्यसनाकडे गेले तर यात दोष कुणाचा? सरकारचा, सिगारेट कंपन्यांचा , की त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा ?यावर विचार करणे गरजेचे आहे.

यावर उपाय काय ?

सरकारी पातळीवर तंबाखूवर असलेला कर वाढवणे तसेच सिगारेटचे दर वाढवणे या सारखी पाऊले उचलावी.

सिगारेटची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या भरपूर जाहिराती करतात. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

सिगारेटच्या पाकिटाचे वेष्टन अतिशय आकर्षक असते. त्यामुळे धूम्रपान करणारे भुलतात. ते शक्य तितके साधे असावे. तसेच त्यावरील धूम्रपान करणे आरोग्यास अपायकारक आहे ही सूचना जरा ठळकपणे दिसावी.

टेलिव्हिजन, रेडिओ, फेसबुक , व्हाट्सअप ,धूम्रपान सोडण्याची संकेतस्थळे (quit smoking sites) या सामाजिक माध्यमातून समाज जागृती करणे आवश्यक आहे. आजकालची तरुणाई या गोष्टींशिवाय जगू शकत नाही. या प्रभावी माध्यमांमुळे जे सिगारेट सोडत आहेत (quitting cigarette) ते आपले ध्येय साधण्यासाठी सकारात्मक विचार करतील.

हे व्यसन सोडण्यासाठी व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाचा विश्वास व सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

धूम्रपान निषिद्ध क्षेत्रे वाढविणे गरजेचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर जास्त कडक कारवाई करणे व त्यांना दंड ठोठावणे याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी.

शाळाकॉलेजांच्या अभ्यासक्रमातून या व्यसनाचा होणारा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे.

या व्यसनामुळे आपल्या कुटुंबावर येणारा ताण ,त्यांना सहन करावे लागणारे धूम्रपानाचे शारीरिक दुष्परिणाम यांची जाणीव धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना करून देणे. त्यायोगे धूम्रपान सोडण्यासाठी प्रवृत्त करणे.

व्यसन सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार व बळ देणे.

शेवटी आपल्या समाजाला लागलेली ही कीड मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे.कारण आपली तरुण पिढी या व्यसना पायी भरकटते आहे. त्यामुळे आपल्या समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासावर फार मोठा दुष्परिणाम होत आहे. म्हणून या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी www.letsquit.net (Vyasan Mukti Kendra) यासारख्या धूम्रपान सोडण्याच्या संकेतस्थळांची (quit smoking sites) मदत घेतली पाहिजे. चहुबाजूनी हा मुद्दा उचलून धरला गेला पाहिजे. तेव्हाच हे व्यसन नियंत्रणात येईल.

संदर्भ
www.tobaccocontrol.bmy
www.ncbi.nlm.nih.gov
www.bbc.com/marathi
www.lokmat.com

Book your Appoinment
Call Now Enquire Now