97308 48504 / 9765 313131

Pune : Every Saturday : 10 am to 5 pm

Wada : Every Thursday & Sunday : 10 am to 5 pm

करोना गो......, गो करोना.......

करोना गो......, गो करोना.......

"करोना गो......, गो करोना......."
"हमने दिया है गो करोना का नारा....., जाग उठा है जग सारा "

या श्री.रामदासजी आठवले यांच्या कविता जरी मिश्किल वाटतं असल्या तरी, त्यात एक खूप मोठा अर्थ दडला आहे. इतिहासाचं सांगते, लाला लजपत राय म्हणाले होते " Simon Go back" आणि नंतर इंग्रजांन विरुद्ध एक प्रचंड मोठं वादळं उठलं. तसेच लाल बहादूर शास्त्री यांचा नारा "जय जवान, जय किसान", तसच काहीस आता " Go Corona" चं होत आहे. तरी असो, मी एक होमिओपॅथिक डॉक्टर असल्यामुळे, आणि व्यसन मुक्ती मध्ये गेले ७-८ वर्षे काम करत आहे, माझे पेशंटस मला विचारत होते की मॅडम corona वर काही उपाय आहे का किंवा कधी यावर उपाय येईल? आमची immunity पॉवर वाढवायला काय करू ? असं बरच काही..

माझं सर्वांना हेच सांगणं आहे की आपली सरकारी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम आहे, आणि आपण सर्वांनी यांना मदत करायला हवी. सरकारी यंत्रणा सध्या जे काही करत आहे, अश्या संसर्गजन्य साथी मध्ये पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला किंवा कोणालाही काही प्रश्न किंवा शंका असतील, तर तुम्ही यंत्रणेला संपर्क साधा.

कुठल्याही WhatsApp, Facebook व अश्या काही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवु नका आणि तसेच सरकारी यंत्रणेवर ताण येणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. आपण जितकं जास्त घराबाहेर जाणे किंवा गर्दीत जाणे टाळनार, तेवढी जास्त मदत यंत्रणेला होईल.

तरी या काळात आपण घरातलं आणि चांगलं शिजवलेलं अन्न खायला पाहिजे. लहान मुलांना आता शाळेला सुट्ट्या आहेत, पण तरी पार्क मध्ये, ग्राउंड वर खेळायला जाण टळलं तर बरं होईल. बाकी वैयक्तिक स्वच्छता तसेच घर, सोसायटीच्या आजूबाजूच्या स्वच्छतेच्या सगळ्या गोष्टी तर सर्वांना माहितच आहे, परत परत तेच काय सांगणार..!

So take care & corona get out
डॉ. पूनम देशमुख (BHMS)
पुणे

Book your Appoinment
Call Now Enquire Now