97308 48504 / 9765 313131

Pune : Every Saturday : 10 am to 5 pm

Wada : Every Thursday & Sunday : 10 am to 5 pm

Thane : Monday to Friday : 10 am to 5 pm

हुक्का किती सुरक्षित ?

मनाला लगाम धुम्रपानाला विराम

“गुड -गुड “ असा आवाज करणाऱ्या हुक्क्याला ओळखत नाही ? पुर्वीच्या सिनेमात अनेकदा सुबक नक्षीकाम केलेला हुक्का ओढताना एखाद्या राजस्थान अथवा बंगालच्या गावातील सावकार अथवा जमीनदाराला आपण पहिले असेल. आरामात खाटेवर अथवा मंचकावर बसून हवेत धुराचे लोट फेकणाऱ्या त्यांना पाहून, हा प्रकार काय आहे प्रश्न तेव्हा अनेकांना पडत असे. यामुळे हुक्क्याला एक आकर्षक वलय प्राप्त झाले आहे.

आजची तरुण पिढी सतत नावीन्याच्या शोधात असते. नेहमी सिगारेट ओढून कंटाळा आल्यावर काही वेगळे वापरून पाहण्यासाठी म्हणून हुक्का ओढला जाऊ लागला आहे. परंतु कोणत्याही स्वरूपात असली तरी तंबाखू वाईटच ! या व्यसनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी, धूम्रपान सोडवण्यासाठी काय उपायकारक ठरते ? (what helps to quit smoking ) हे तुम्ही जाणून घ्या.

जवळजवळ ४०० वर्षांपूर्वी या हुक्क्याचा जन्म झाला. प्रथम भारतात याचा शोध लागला. त्यानंतर अरब देशात हा वापरला जाऊ लागला. तेथून पुढे जगातील इतर देशात याचे वेड पसरले. आधी थोड्या प्रमाणात असलेल्या या सवयीचे व्यसनात परिवर्तन झाले. याचे शरीरावर होणारे परिणाम सिगारेटप्रमाणेच हानिकारक असतात. त्यामुळे धूम्रपान सोडण्याचे सोपे उपाय (easy way to stop smoking) वापरून तुम्ही हे व्यसन सोडू शकता.

हुक्का हे काय असते? तर एक भांडे, जे गोड पदार्थ व स्वाद घातलेल्या तंबाखूचा धूर ओढण्यासाठी वापरले जाते. ह्यात एक पाण्याचा कप्पा, तंबाखूचा कप्पा तसेच अनेक जोडलेल्या नळ्या असतात. वरील बाजूस मातीच्या छोट्या भांड्यात जळत्या कोळश्यावर तंबाखू ठेवला जातो. या भांड्याचा तळाशी जाळी असते. त्यातून तंबाखूचा धूर आत झिरपतो. पाण्याच्या भांड्यावरून वाहत तो अनेक नलिकांमधून मधून बाहेर येतो.

हुक्का एवढा का बरे चालतो?

  • हूक्का हे आजच्या काळातील तरुण पिढीच्या आकर्षणाचे कारण आहे. ते एक फॅशन स्टेटमेन्ट मानले जाते. यातील तंबाखू चॉकोलेट, पुदिना, चेरी, कॉफी व इतर अनेक आकर्षक स्वादात उपलब्ध आहे. या स्वादामुळे तरुण मुलांना मजा वाटते. हुक्क्यातील तंबाखूमध्ये मध, गूळ अथवा फळांचा गर घालून तंबाखूला गोडवा दिला जातो. अत्यंत सुबक आकारात व विविध रंगात तो बघणाऱ्याला मोहून टाकतो.
  • इतर मुले हुक्का ओढतात तेव्हा तुम्हालाही ते करून बघण्याची इच्छा होते. एकदा सवय झाल्यावर मला धूम्रपान थांबवायचे आहे (I want to stop smoking ) असे म्हणणे कठीण असते. हुक्का पिणाऱ्या मुलांच्या गटात टिकून राहण्यासाठी त्यांच्याप्रमाणे वागणे, बोलणे, त्यांच्या सवयींचे अनुकरण करणे भाग असते. नाहीतर असे न करणाऱ्या मुलांना त्रास सहन करावा लागतो. मित्रमंडळी जबरदस्तीने मुलांना हे व्यसन करायला भाग पडतात.
  • हुक्का हा नैसर्गिक वनस्पतींनी युक्त आहे त्यामुळे तो सुरक्षित आहे असे मानले जाते. सिगारेटपेक्षा हुक्का ओढणे कमी धोकादायक आहे कारण यात निकोटीन नावाचे रसायन नाही असाही समज आहे. रोजच्या तणावपूर्ण वातावरणात एकत्र येऊन थोडा वेळ शांततेने घालवण्याचे एक साधन म्हणून याकडे पाहिले जाते. हुक्का तंबाखूचे वेष्टन अत्यंत आकर्षक असते. त्यामुळे धूम्रपानाची तलफ सोडण्यासाठी (quit smoking cravings) प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्ती परत त्याकडे ओढल्या जातात. अनेक व्यक्ती एकाच हुक्क्यातून तंबाखूचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळे मित्रांच्या सोबत एकत्र मजा घेण्यासाठी मुले याचा वापर करतात.मनोरंजनाचे तसेच फावला वेळ घालवण्याचे साधन म्हणून याकडे पहिले जाते.

हुक्क्क्याचे दुष्परिणाम काय?

  • हुक्क्यात तंबाखू असल्यामुळे तो सिगारेटप्रमाणे आरोग्यास धोकादायक आहे.विविध प्रकारचे श्वसन तसेच हृदयाचे रोग, अनेक प्रकारचे कर्करोग तुम्हाला यामुळे जडू शकतात. म्हणून धूम्रपान सोडण्यासाठीचे उपाय (remedies to quit smoking ) वापरून तुम्ही यापासून दूर राहा. अनेक नाईट क्लब मध्ये हुक्का पार्टी आयोजीत केली जाते. यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. एका व्यसनासाठी तुम्ही एवढे पैसे का वाया घालवत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यापेक्षा तंबाखू सोडण्यासाठीच्या औषधांवर (tobacco quit medicine) हा खर्च केला तर तुमचं व तुमच्या कुटुंबाचं भल होईल. एकाचवेळी अनेकजण वापर करत असल्यामुळे अनेक साथीचे रोग तुम्हाला होऊ शकतात.तसेच हुक्क्याच्या एकाच नळीला अनेकांचे तोंड लागल्यामुळे त्यांचा संसर्ग एकमेकांना होतो. हुक्क्यातही सिगारेटप्रमाणे अनेक विषारी घटक आढळतात. यात निकोटीन तसेच अनेक प्रकारची रसायने असतात. एकाच बंद खोलीत अनेकजण उपस्थित असताना हुक्क्याचा वापर करत असल्यामुळे अनेक साथीचे रोग होऊ शकतात. एकाच वेळी सिगारेट पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर धूर यातून येत असल्याने हा सिगारेट पेक्षा जास्त धोकादायक आहे. हुक्क्यातील धुरामुळे तो न ओढणाऱ्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही सिगारेटच्या धुराप्रमाणेच त्रास होतो.यातील धूर श्वसनलिकेला कमी प्रमाणात जळजळ निर्माण करतो. परिणामी तुम्ही अधिक वेळ म्हणजेच ४५ ते ६० मिनिटे याचे सेवन करता .त्यामुळे सिगारेटइतकाच वाईट परिणाम फुफुसांवर होतो.हुक्क्यातील पाणी तंबाखूतील अपायकारक रसायने कमी करतात असे मानले जाते. परंतु पाण्यामुळे हा धूर थंड होतो. त्यामुळे त्याने श्वसनलिकेला होणारी जळजळ कमी होते.हुक्का ओढण्याच्या नळ्या न धुता वापरल्यामुळे अनेक संसगजन्य रोग होतात.धुराच्या सेवनामुळे वंध्यत्व येऊ शकते.कालांतराने तुमच्या दातांवर परिणाम होऊन ते पडू शकतात.
  • हुक्क्याच्या तंबाखूवर तो अपायकारक असल्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही, मला धूम्रपान सोडायचे आहे (I want to stop smoking) असे म्हणत या हुक्क्यापासून दोन हात लांब राहीले पाहिजे. यासाठी तुम्ही व्यसन मुक्तीसाठी पुनर्वसन (deaddiction centre) करणाऱ्या संस्था ठाणे, पुणे व मुंबईला स्थित आहेत. येथे तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठीच्या युक्त्या (leave smoking tips) दिल्या जातील. तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठी (quitting smoking) मदत करू शकतील.
  • या हुक्कयाच्या चाहत्यांमध्ये तरुण पिढी प्रामुख्याने आढळून येते. या मुलांना त्याचे वेडच लागले आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणून तर बऱ्याच महाविद्यालयांजवळ अशी हुक्का पार्लर्स दिसून येतील. हे वेड एवढे वाढले आहे की आता धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती हुक्का स्वतः खरेदी करून अथवा भाड्याने आणून आपल्या घरात या पार्ट्या साजऱ्या करीत आहेत.
  • हुक्कापार्लर्सना धंद्याचा एक चांगला स्रोत मिळाला आहे जो नफाही भरपूर देतो. हा धंदा वाढवण्यासाठी तरुण पिढीला लक्ष्य केले जात आहे. आता जागोजागी हुक्का पार्लर्स तुम्हाला दिसतात. तसेच बरेच रेस्टोरेंट्सही तुम्हाला हुक्का उपलब्ध करून देतात. यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला वाईट नादाला लावले आहे.

तेव्हा www.letsquit.in अश्या धूम्रपान सोडण्याच्या संकेतस्थळांचा (quit smoking sites) वापर तरुण पिढीने केला पाहिजे . तुमचे व्यसन सोडण्यासाठी अतिशय उपयोगी अशी तंबाखू सोडण्याची औषधे ( quit tobacco medicines) येथे मिळतील. तसेच धूम्रपान सोडण्याचे सोपे उपाय (easy way to stop smoking ) तुम्हाला समजतील.मग वाट कसली पाहताय? चला तर मग आपले जीवन सुधारूया ! या व्यसनापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवूया.

संदर्भ
www.mayoclinic.org.com
www.verywellmind.com

Book your Appoinment




Call Now Enquire Now