संधिवात हे नाव ऐकताच हल्ली धक्का बसतो. कारण हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर साथ देतो जी अतिशय दुःखद असते. स्वयंप्रतिरोधक रोग (autoimmune disease) असल्यामुळे यात तुमच्या स्वतःच्या पेशी चुकीने आपल्या सांध्यांवर हल्ला करतात. आजकाल हा आजार सर्रास दिसून येते. तुमच्या शरीरातील दोन हाडांना जोडणाऱ्या सांध्यांमध्ये सूज येते. त्यांच्यावर लालसरपणा दिसून येतो. तसेच भयानक प्रमाणात आणि सतत होणारे दुखणे सहन करावे लागते. आजार जास्त बळावल्यास हाता पायाची बोटे वाकडी होतात. सांध्यांची व हाडांची क्षमता कमी झाल्यामुळे रुग्णाला जास्त वजन उचलणे तसेच दीर्घकाळ काही काम करणे जमत नाही.
आता पाहू या हा आजार का जडतो ते …
- तुमच्या शरीराला रोज योग्य प्रमाणात सर्व प्रकारची पोषक तत्व व खनिजे मिळणे आवश्यक असते. यांच्या कमतरतेमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.
- शरीरात जास्त प्रमाणात आम्लपित्त तयार होत असेल व असे वारंवार होत असेल तर विषद्रव्ये साचून रक्त दूषित होते. सांध्यांमध्ये हे पित्त साचते.
- तुम्ही दररोज पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे नाहीतर शरीराची झीज भरुन न आल्यामुळे अशक्तपणा येऊन ते रोगग्रस्त होऊ शकते.
- बऱ्याच वेळा हा आजार अनुवांशिकअसतो. तुमच्या शरीरातील काही विशिष्ट जनुके यासाठी जबाबदार असू शकतात.
- वाढत्या वयामुळे तुमच्या सांध्यांची व हाडांची झीज होते.
- सांध्यांची लवचिकता वाढण्यासाठी दररोज त्यांना योग्य प्रमाणात व्यायाम मिळणे आवश्यक असते. परंतु आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे तो कमी झाला आहे.याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात.
- नोकरीपेशामुळे बऱ्याच जणांना व्यायाम करण्याकरता वेळ मिळत नाही. कार्यालयात बराच वेळ एकाच ठिकाणी बसण्याच्या सवयीमुळे सांध्यांवर ताण येतो व त्यांची कार्यक्षमता कमी होते.
- मोठ्या प्रमाणावर असलेल्या मानसिक ताणामुळेही काही वेळा शरीराला संधिवातासारखे रोग लागू शकतात.
संधिवात असणाऱ्या मनुष्याला दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आपले जीवन नकोसे वाटू लागते. या आजाराला कंटाळलेले अनेक रुग्ण सांध्यांचे दुखणे विसरण्यासाठी धूम्रपानासारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. परंतु शेवटी हे व्यसन आहे. त्याचे दुष्परिणाम भयानक होतात.
धूम्रपानाचे संधिवातावर होणारे काही परिणाम बघूया …
- धूम्रपान हे तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात सूज निर्माण करते. त्यामुळे हे तुमची हाडे, सांधे यांच्यासाठी अतिशय धोकादायक आहे.
- धूम्रपान रोगप्रतिकारकशक्ती कमी करते. त्यामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. तुमच्या शरीरातील पेशी नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकांवरही होतो त्यांच्या बांधणीमध्ये बदल घडून येतात.
- धुम्रपानामुळे संधिवात व त्यासारख्या इतर आजारांमध्ये रुग्णाचे दुखणे आणखी वाढते.
- सिगारेटच्या धुरामुळे शरीरात काही अशी काही घातक प्रथिने निर्माण होतात जी संधिवाताची तीव्रता आणखी वाढवतात.
- संधिवात असणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान केल्यास हृदय आणि फुफुसांनाही धोका संभवतो.
- शरीरातील सुजेमुळे तुम्हाला हृदयाचा झटका येऊ शकतो. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा धोका आणखी वाढतो. म्हणून त्यांना हृदयविकार होऊ शकतो.
- संधिवाताचा रोग अनुवांशिक असल्यास तुमच्या घरांमध्ये धूम्रपान न करणेच योग्य कारण याचा विपरीत परिणाम लहान मुलांच्या प्रकृतीवर होऊन पुढच्या आयुष्यात त्यांना हा रोग होण्याची शक्यता वाढते.
- सिगारेट मध्ये असलेल्या निकोटिनमधील अनेक प्रकारच्या विषारी द्रव्यांमुळे रक्त दूषित होते. रक्ताची ऑक्सिजन हा प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. परिणामी शरीरातील पेशींपर्यंत तो पोहोचत नाही म्हणून पेशींच्या कार्यशक्तीवर याचा परिणाम होतो.
- अनेक वर्षे तसेच जास्त प्रमाणात तुम्ही धूम्रपान केल्यास संधिवात होण्याचा धोका वाढतो.
- निकोटिनमुळे रक्तातील कार्बन मोनॉक्साइड वाढतो. सांध्यांमधील तंतूंच्या दुरुस्तीत यामुळे अडथळा येतो.
- धूम्रपान करणाऱ्या संधिवाताच्या रुग्णांमध्ये सांधेदुखी ते न करणाऱ्यांपेक्षा अधिक प्रमाणात आढळून येते.
- संधिवाताचे निदान झाल्यावरही तुम्ही धूम्रपान चालू ठेवल्यास अशावेळी घेतल्या गेलेल्या रोगावरील औषधांचा परिणाम ते न करणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी होतो.
- काही अभ्यासानुसार संधिवात असणाऱ्या ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांचा मृत्युदर धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा दुपटीने अधिक आहे.
- सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढे संधिवात होण्याची शक्यताही ती न ओढणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक असते.
- तंबाखू हाडांना व उतीना मिळणार प्राणवायूचा व पोषक तत्वांचा पुरवठा कमी करतो. यामुळे पाठीच्या कण्यातील मणक्यांची झीज अधिक प्रमाणावर होते. त्यामुळे अस्थिसुषिरता (osteoporosis ) यासारखा रोग जडतो.
- रोज धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाण इतर महिलांपेक्षा दुपटीने अधिक आहे.
हा आजार असणाऱ्या व्यक्तीला धूम्रपान दुखण्यापासून तात्पुरता दिलासा देते . परंतु हा काही कायमचा उपाय नव्हे. या व्यसनाचे तुमच्या शरीरावर होणारे दुष्पपरिणाम पाहता असे म्हणता येईल की तुम्ही हे व्यसन सोडण्यासाठी सर्व आवश्यक ते प्रयत्न केलेच पाहिजेत. म्हणून धूम्रपान सोडण्याचा निर्णय हा संधिवातावर मात करण्यासाठी मदतच करणारा ठरेल. तुमच्यावर चालू असलेल्या औषधोपचारांना शरीर चांगल्याप्रकारे साथ देईल.
दररोज व्यायाम किंवा योगासने करणे ही चांगली सवय तुम्ही अंगिकारली पाहिजे. या रोगावरील उपचाराला उपायकारक ठरेल असे वर्तन तुम्ही करा. त्यासाठी www.letsquit.net यासारख्या संकेतस्थळांवर जाऊन तेथे धूम्रपान सोडण्याचे सोपे मार्ग (easy way to quit smoking) जाणून घ्या. या व्यसनमुक्ती केंद्रावर तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठी उपयुक्त सूचना (leave smoking tips) मिळतील. तुमचा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही यासारख्या व्यसनमुक्ती केंद्रांचा लाभ घ्या. .
संदर्भ
www.blog.arthritis.org
www.healthline.com
www.alth.clevelandclinic.org
www.verywellhealth.com
www.webmd.com
www.health.usnews.com