97308 48504 / 9765 313131

Pune : Every Saturday : 10 am to 5 pm

Wada : Every Thursday & Sunday : 10 am to 5 pm

Thane : Monday to Friday : 10 am to 5 pm

Influence of Cigarette Smoking on Thyroid Disorder

Thyroid Disorder

आज काल मेडिकल टर्म मध्ये सहज ऐकू येणार शब्द म्हणजे Thyroide Test , हार्मोनल इम्बॅलन्स, पण हे आहे तरी काय? आणि धूम्रपान व मद्यपान व्यसनांचा (smoking & drinking habbits ) याच्याशी काय संबंध ?

तसं आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी(glands ) असतात , त्यातील गळ्याच्या मध्य भागात असलेली हि मानवी शरीरातील महत्वपूर्ण ग्रंथी , पण तितकीशी जनजागृती नसलेली. या ग्रंथी T4 व T3 नावाचे हार्मोन्स तयार करतात जे शरीराची metabolic rate योग्य रितीने चालवण्यास मदत करतात ज्यामुळे पचनसंस्थाचे काम उत्तम चालते. एवढेच नाही तर स्नायु control , ब्रेन डेव्हलोपमेंट , मूड आणि बोन maintainace यांचे योग्य नियोजन हे thyroid gland मुळेच होते. या हार्मोन्स योग्य प्रमाणांत तयार होण्याचे काम मेंदूच्या भागातील Pituitary Gland मुळे साध्य होते. त्यामुळेच मेंदूशी निगडित असलेली कोणतीही इजा व विचार हे थायरॉईड ग्रंथीवर प्रभावी पडू शकतात.

भारतात प्रत्येक १o व्यक्तींच्या मागे १ व्यक्ती ही thyroid disorder ने ग्रस्त असते. थायरॉईड ग्रंथाने योग्य काम देणे बंद केले तर काय होऊ शकते ? शरीरावर त्याचे किती खोलवर आणि घटक परिणाम होऊ शकतात हे thyroid चे problems सुरु झाल्यावरच लक्षात येतेत.

थायरॉईड डिसऑर्डरचे काही प्रकार बघुयात

  • Hypothyroidism - हायपोथायरॉइसम , हाआजार थायरॉईड हार्मोन्स कमी प्रमाणात तयार झाल्याने होतो. यामध्ये वजन वजन वाढणे, cholestrol जास्त होणे , डिप्रेशन , केस गळणे , थकवा , स्मरणशक्ती कमकुवत होणे , स्किन ड्राय दिसणे , पायाला सूज येणे , अंग दुखणे , एकाग्रतेचा अभाव अशा आयुष्यभर साथदेणाऱ्या परिणामांचा समावेश असतो.
  • Hyperthyroidism - हायपरथायरॉइसम , यामध्ये ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करतात व याचे परिणाम म्हणून मेंदूशी वा मनाशी असलेले परिणाम उद्भवतात. ज्या मध्ये अस्वस्थता , व्याकुळता , चिंता , झटके येणे , भूक वाढणे पण वजन कमी होणे, घाम येणे , हृदयाचे ठोके वाढणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
  • Goiter किंवा गंडमाला - हा प्रकार थायरॉईड डिसॉर्डरमध्ये सर्वात प्रचलित असलेला प्रकार , ज्या मध्ये थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढल्यामुळे गळ्याला सूज आल्यासारखे दिसते.
  • Thyroid Nodules (थायरॉईड नोड्यूल) - हा अंतःस्रावी होणार त्रास थायरॉईड डिसऑर्डर आजाराची पुढची level पण असू शकते. काहींना घशात व कानांमध्ये वेदना होतात तर काहींना अन्न गिळण्यास व श्वास घेण्यास त्रास होतो. बऱ्याच वेळा हा त्रास सौम्य असला तरी ठराविक वयोगटासाठी कर्करोगाचे कारणही ठरू शकते.
  • Thyroid Cancer ( थायरॉईड कर्करोग ) - स्त्रीयांमध्ये पुरुषानंपेक्षा जास्त आढळणारा थायरॉईड कॅन्सरची करणे अनिश्चित आहेत पण थायरॉईड आनुवंशिकतेमुळे हे होण्याची शक्यता जास्त आहे. थायरॉईड मुळे होणारे त्रास हे काही अप्रत्यक्ष कारणांमुळे होऊ शकतात जसे अनुवंशिकता , धकाधकीची दिनचर्या, घशातीलगाठी व काही प्रत्यक्ष आयोडीनची कमतरता , मेडिकल ट्रीटमेंट, बॅक्टरीयाच्या संसर्गामुळे वा मद्यपान - धूम्रपानमुळे. Known facts are always ignored ! असं म्हणतात कारण मद्यपान - धूम्रपानचे परिणाम कितीही वाईट असले तरीही बऱ्याच लोकांना smoking cravings किंवा drinking habits quit करणे कठीण जाते. अशा व्यसनांमुळे तुम्हाला मोठे आजार तर होण्याची शक्यता असतेच पण दैनंदिन जीवनातही अडथळे येऊ शकतात.

त्याचेच उदाहरण म्हणजे या व्यसनांमुळे Thyroide वर होणार विपरीत परिणाम. अल्कोहोल व धूम्रपान हे जगभरात वापरल्या जाणार्या सामान्य अवैध मनोवैज्ञानिक पदार्थांपैकी एक आहे आणि रोग आणि अपंगत्वासाठी जगातील सर्वात मोठा जोखीम घटक आहे. हायपोथालेमो -पिट्यूटरी-थायरॉईड ऍक्सिस आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्य-प्रणालीवर याचा एकाधिक प्रभाव असल्याचे नोंदवले गेले आहे. हे सेल्युलर टॉक्सिसिटी थायरॉईड फंक्शनचे थेट surpress करतात आणि indirectly थायरोट्रॉपिन-रिलीझिंग हार्मोन प्रतिसादाला बोथट करते. धूरात हजारो रसायने असतात आणि त्यातील काही थायरॉईडच्या प्रतिक्रियेसाठी रोगप्रतिकारक शक्तीस चालना देतात.

धूम्रपान व मद्यपान सोडण्यासाठी Nicotine पॅच पासून संमोहन करण्यापर्यंत विविध पद्धतींनी प्रयत्न केला जातो आणि यशस्वी सर्वेक्षणानुसार लोक सोडण्याची तयारी दर्शवितात.

शिक्षण, समुपदेशन आणि वारंवार तपासणी सुचविली जाते. थेरपीमध्ये सिगारेटच्या संबंधित महत्त्वपूर्ण पुनरुत्पादक जोखमींबद्दल संभाषण असू शकते. धूम्रपान करण्याच्या बऱ्याच हानीकारक गोष्टींमुळे लोक वर्षानुवर्ष धूम्रपान सोडण्यास प्रवृत्त होऊ शकतात. अशा माहितीबद्दल बोलणे देखील उपयुक्त आहे. धूम्रपान बंद करण्यासाठी (Quit Smoking) शैक्षणिक वेबसाइट उपयुक्त ठरेल परंतु इतर शैक्षणिक हस्तक्षेपाशिवाय अशक्य आहे.

व्यसन सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार व बळ देणे.

शेवटी आपल्या समाजाला लागलेली ही कीड मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. कारण आपली तरुण पिढी या व्यसना पायी भरकटते आहे. त्यामुळे आपल्या समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासावर फार मोठा दुष्परिणाम होत आहे. म्हणून या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी www.letsquit.net (Vyasan Mukti Kendra) यासारख्या धूम्रपान सोडण्याच्या संकेतस्थळांची (quit smoking sites) मदत घेतली पाहिजे. चहुबाजूनी हा मुद्दा उचलून धरला गेला पाहिजे. तेव्हाच हे व्यसन नियंत्रणात येईल.

Book your Appoinment
Call Now Enquire Now